Slider

SUB MENU

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

WOULD YOU LIKE TO DONATE?


            मित्रांनो मी एक जी.प. शिक्षक असल्यामुळे व आमच्या जवळ समाजातील सर्वात गरीब घरातील मुले-मुली शिकत असल्यामुळे व त्यांनासुद्धा इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये जे शिक्षण मिळते त्याच दर्जाचे शिक्षण देण्याहेतू आम्ही शाळा डिजिटल करीत आहोत. शाळा डिजिटल करून त्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाने विकसित सोफ्टवेअर द्वारा मुलांना शिकवीत आहोत. हि एक सुरुवात आहे........... 
           गरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणे व त्यांना सुद्धा इतर मुलांच्या बरोबरीत आणणे या सारखे पवित्र कार्य कोणतेच नाही असे मला वाटते. यामध्ये जर आपले सहकार्य लाभले तर मला खात्री आहे आपण आपल्या मुलाना जे शिक्षण देतो ते शिक्षण घेण्याचा सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना  अधिकार आहे परंतु घरच्या परिस्थितीमुळे खेड्यातील मुले व तेही गरीब घरातील मुले असे दर्जेदार शिक्षण घेवू शकत नाही. परंतु भविष्यात नक्कीच आपल्या सहकार्यामुळे ते गरीब घरातील विद्यार्थी सुद्धा अधिकारी, पदाधिकारी, उद्योजक व  भारताचे यशस्वी नागरिक  बनतील. आजची मुले उद्याचे भावी नागरिक असून तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांना अपेक्षित असलेला ‘माणूस’ त्यांच्यातून घडविण्यास मदत होईल.
            तर मित्रांनो जर आपली इच्छा असेल तर या महत्वपूर्ण कार्यात सहकार्य करा व या पवित्र कार्यात नक्की हातभार लावा व आपल्या मित्रांना सुद्धा सहकार्य करण्यास प्रोत्साहित करा. 

तर सहकार्य करण्या हेतू संपर्क करा :  प्रवीण भैस्वार (नावावर क्लिक करा)

त्रिवार धन्यवाद !

No comments:

Post a Comment